हिरड्या मजबूत तर दात मजबूत

 

 

 

 

 

हिरड्या मजबूत तर दात मजबूत

दातांसोबत हिरड्यांचं आरोग्यही महत्वाचं असतं, यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, 

रक्त येणे अशा अडचणी येतात. जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत. निदान चुळ भरणे तरी  आवश्यक असते, ते देखील अनेक लोक करत नसल्याने, दातांवर घट्ट स्तर निर्माण होतो. 

दातांना कीड लागते

या जंतुमुळे दातांना कीड लागते. याचा परिणाम हिरड्यांवर होतो. हिरड्या सुजतात, हिरड्यातून रक्त येते किंवा दात आणि हिरड्यांमध्ये अंतर तयार होतं. यासाठी दातांची समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार न

 झाल्यास हिरड्यांमध्ये पु सुद्धा होऊ शकतो.

कच्च्या भाज्या चावून खा

हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या चावून खाव्यात. 'सी' जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे, यामुळे हिरड्या मजबूत होतात. आवळा, संत्री तसेच मोसंबी अशी फळे खाणे दातांसाठी नेहमीच चांगले असते.

दात अधिक मजबूत ठेवण्यासाठी दिवसातून दोनवेळा दात घासले तर सर्वोत्तम...

दातात पदार्थ अडकल्यास...

काहीही खाल्यानंतर दातात अडकलेले खाद्यपदार्थांचे कण टूथपिकने काढावेत. दातांमध्ये अडकलेले हे कण कालांतरानं कूजतात. त्यामुळे हिरड्यांचं आरोग्य बिघडतं.

खाद्यपदार्थांचे कण काढताना धारदार वस्तूंचा वापर करू नये. यामुळे जखम झाल्यास सेप्टिक होण्याचा धोका असतो.

हिरड्यांसाठी हा व्यायाम आवश्यक

हिरड्यांतील रक्ताभिसरणात वाढ, हिरड्यांमध्ये ताकद येण्यासाठी. तोंडाचा व्यायाम केल्याने हिरड्यांचं आरोग्य नक्कीच सुधारतं, वरचे दात खालच्या दातांवर दाबावेत, यामुळे देखील दात मजबूत होतात.

गोड खाल्ल्यानंतर...

 साखर म्हणजेच गोड खाल्ल्याने देखील बॅक्टेरिया निर्माण होतात. हे बॅक्टेरिया हिरड्यांमध्ये साचून राहतात यामुळे दात किडतात आणि दातातून रक्त येते.

 

चोपडे दातांचा दवाखाना 

डेंटल इंप्लांट व रूट कॅनाल सेंटर,विजयनगर सांगली,

 फोन  नंबर -: +९२०९६०९०९० 

About Chopade Dental Clinic , Implant & Root Canal Center

Established in the year 2015, Chopade Dental Clinic in Vijay Nagar, Sangli is a top player in the category Dentists in the Sangli. This well-known establishment acts as a one-stop destination servicing customers both local and from other parts of Sangli.

Quick Contact

Copyright © 2021-22 Chopade  Dental Clinic . All rights reserved.

Designed & Developed by XTechnoSys

Search